एका निवेदनात, कंपनीने म्हटले आहे की, “रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे स्पष्ट करू इच्छिते की अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाची लंडन किंवा जगाच्या इतर कोणत्याही भागात स्थलांतर करण्याची किंवा राहण्याची कोणतीही योजना नाही. रिलायन्स ग्रुपच्या RIIHL ने लंडनमधील स्टोक-पार्क इस्टेट विकत घेतली आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीचे गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्टमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना आहे.