वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्या भेटीचा व्हिडिओ लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे संपूर्ण प्रकरण अपहरण आणि खंडणीचे असल्याचे मलिक यांनी सांगितले. तिकीट खरेदी केल्यानंतर आर्यन स्वत: क्रूझवर गेला नसल्याचे त्याने सांगितले. त्याला प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला तिथे घेऊन आले. तेथून आर्यनचे अपहरण करून 25 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. एका सेल्फीने सगळा खेळ बिघडवला.