मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवरील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असतील. दरम्यान, त्याचवेळी परमबीर सिंह यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना परदेशात जाता येणार नाही.
खंडणी आणि अन्य आरोपांखाली गुन्ह्यांबाबत परमबीर सिंह यांना न्यायालयाने २८ जुलै पर्यंत दिलासा दिला होता. या त्याची मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबई पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताआहे. दरम्यान, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.