मिळालेल्या माहितीनुसार बीएससी स्टाफ कॉलनीतील पाण्याची टाकी बुधवारी संध्याकाळी तुटली. त्यात चार जण गाडले गेले. या अपघातात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून एका अल्पवयीनसह तीन जण जखमी झाले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या निवारा नियोजन कक्षाने 'एसडब्ल्यूएम स्टाफ क्वार्टर्स'च्या बांधकामासाठी तात्पुरती टाकी बसवली होती. “हे सर्व लोक कंत्राटदाराशी संबंधित होते आणि पाण्याच्या दाबामुळे टाकी फुटल्याचे दिसते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पण या अपघाताचे खरे कारण अजून समजू शकलेले नाही.