महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारा स्टँडअप कँमेडियन कुणाल कामरा यांचा अडचणीत वाढ झाली आहे. खार पोलिसांनी कामराच्या विरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल केले आहे. तसेच मुंबई पोलिसांनी कामरा यांना आज म्हणजेच 31 मार्च रोजी हजर होण्यास सांगितले आहे. गेल्या दोन समन्स मध्ये कामरा त्यांची बाजू मांडण्यासाठी हजर राहिले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामरा यांना मंगळवार 25 मार्च रोजी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते त्यांनी सात दिवसांचा वेळ मागितला. पोलिसांनी दिलेल्या दुसऱ्या समन्समध्ये कामरा यांना 31 मार्च रोजी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यासंदर्भात कामरा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र विधान परिषदेनेही विशेषाधिकार भंगाची सूचना स्वीकारली आहे. त्याच्या इंस्टाग्राम बायोनुसार, कामरा सध्या पुडुचेरीमध्ये आहे.