उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित भागांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेता त्यांनी हे पाऊल उचलले.
या बैठकीला पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डावले, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, एमआयडीसीचे सह-व्यवस्थापक डॉ. कुणाल खेमनार आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.