इंस्टाग्रामवर झालेली मैत्री ठरली धोकादायक, मुंबईत मुलीच्या चुकीचा फटका बसला कुटुंबाला

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (13:06 IST)
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत केलेली मैत्री किती महागात पडू शकते हे मुंबईत घडलेल्या घटनेवरुन कळू शकेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मुलासोबत झालेल्या मैत्रीत मुलीला आणि तिच्या कुटुंबाला किती फटका बसला जाणून घ्या. ही घटना आहे मुंबईच्या कुलाबा परिसरातील.
 
कुलाब्यात एक चार्टर्ड अकाउंटचं कुटुंब राहत असून त्यांच्या मुलीची इंस्टाग्रामवर एका १९ वर्षीय शैजान अगवान नावाच्या तरुणासोबत मैत्री झाली. काही दिवसांमध्येच दोघांमध्ये इतका विश्वास निर्माण झाला की मुलीने त्या माझगावमध्ये राहणार्‍या तरुणाला आपल्या घराची डुप्लिकेट चावी देऊन दिली. काही दिवसांनी मुलीचे कुटुंबिय फिरण्यासाठी बाहेर गेले होते आणि २७ जानेवारी रोजी घरी परतल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण घरातून १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एक आयफोन गायब होता. 
 
या प्रकणानंतर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. घटना तपासताना पोलिसांना घरात कोणी बळजबरी शिरलेलं नसून घराबाबत माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच चोरी केल्याचं लक्षात आलं. पोलिसांना जेव्हा पुरावा मिळाला नाही तेव्हा पोलिसांच्या सांगण्यावरुन तक्रारकर्त्यांना स्वतःच्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा हे उघडकीस आले की मुलीने शैजान नावाच्या एका मित्राला घराची डुप्लिकेट चावी दिली होती. 
 
मुलीने त्याच्यासोबत कशाप्रकारे भेट झाली आणि मैत्री कशी झाली याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तरुणाला अटक केली आणि त्याच्याकडून एक लाख रुपये आणि आयफोन जप्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती