57वर्षीय पीड़ित व्यावसायिक यांनी फसवणुकीची तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. तक्रारदार हे शीव परिसरात वास्तव्यास आहे. चव्हाण यांना ते2019 पासून ओळखत होते. चव्हाण यांनी दादर, ठाणे, परळ आणि पुणे येथे भूखंड आणि घरे विकण्याच्या बहाण्याने 24 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक केली. एफआयआरनुसार, चव्हाणने फसवणूक करून इतर आरोपींच्या खात्यातून पैसे स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर केले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.