शनिवारी सकाळी आरे कॉलनी परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एका वृद्ध महिलेला अत्यंत अशक्त अवस्थेत पडलेले पाहून एका वाटसरूने मुंबई पोलिसांना कळवले. वृद्ध महिलेच्या शरीरावर जखमा होत्या, ती चालतही येत नव्हती आणि इतकी अशक्त होती की ती नीट बोलूही शकत नव्हती.
पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा तिने तुटलेल्या शब्दात सांगितले, "माझा नातू मला इथे सोडून गेला..."महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिला नातवासोबत मालाड मध्ये राहायची.
आरे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वृद्ध महिलेला ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची प्रकृती पाहून अनेक रुग्णालयांनी तिला दाखल करण्यास नकार दिला. अखेर तिला सायंकाळी 5:30 वाजता बीएमसीच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून महिलेची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचा शोध सुरू केला आहे आणि त्यांचे फोटो सर्व पोलिस ठाण्यांमध्ये शेअर केले आहेत. आणि जनतेला आवाहन केले आहे की जर कोणाला यशोदा गायकवाडबद्दल काही माहिती असेल किंवा तिला ओळखत असेल तर त्यांनी त्वरित आरे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.