तक्रारीनुसार, हितेश मेहता बँकेचे महाव्यवस्थापक असताना ते दादर आणि गोरेगाव शाखांची जबाबदारी सांभाळत होते. त्यावेळी हितेशने आपल्या पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यांमधून १२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी दादर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
या घोटाळ्यात हितेश मेहता आणि आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते, त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी ते आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आले आहे. आता शनिवारी संध्याकाळी, आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी हितेश मेहताला अटक केली आहे.
रिझर्व्ह बँकेने13 फेब्रुवारी रोजी बँकेच्या कामकाजावर अनेक बँकिंग संबंधित निर्बंध लादले आहेत. आरबीआयच्या या कडक कारवाईनंतर, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ग्राहकांना कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणाकडूनही ठेव घेऊ शकणार नाही.