न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांची पत्नी गौरी भानू यांना फरार गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणातील पाच आरोपींच्या 167.85कोटी रुपयांच्या21 मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली, नवीन फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर शहरातील ही पहिलीच कारवाई होती. या मालमत्तेत 150 कोटी रुपयांचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प देखील समाविष्ट आहे. हे घोटाळे प्रकरण उघडकीस येण्याच्या काही दिवस आधी, फेब्रुवारीमध्ये भानू दाम्पत्य देश सोडून पळून गेले होते.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आतापर्यंत बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि माजी सीईओ अभिमन्यू भोन यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईओडब्ल्यूने भानू आणि त्याच्या पत्नीला फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे. न्यायालयाने यापूर्वी दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
या घोटाळ्यात हितेश मेहता आणि आणखी एक व्यक्ती सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते, त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी ते आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी हितेश मेहताला अटक केली आहे.