महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती : शेतात 100 कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या, आता 25 हजारांहून अधिक पक्षी मारले जाणार

शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (15:52 IST)
महाराष्ट्रातील ठाण्यातील 100 कोंबड्यांच्या आकस्मिक मृत्यूने जिल्हा प्रशासनाचे कान उपटले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात पुन्हा बर्ड फ्लूची भीती निर्माण होऊ लागली आहे. अशा स्थितीत येथील 25 हजारांहून अधिक कोंबड्या मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ठाण्यातील शाहपूर तालुक्यातील वेहोली गावात असलेल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये 100 कोंबड्यांचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हा प्रशासनाने मृत कोंबडीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी सांगितले की, संसर्गाची शक्यता लक्षात घेता पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिघात येणाऱ्या 25 हजारांहून अधिक पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती