वर्ष 2017 मध्ये नारायण राणे यांच्या जुहूच्या बंगला अधिश याचे बांधकाम सीआरझेड च्या नियमांचं उल्लंघन करून केले असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी केली होती. या कारणास्तव मुंबई महापालिकेने नंतर नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. के पश्चिम वॉर्ड च्या अधिकाऱ्याने या नोटीसवर स्वाक्षरी केली असून मालकाला बेकायदशीर बांधकाम केल्याच्या तक्रारीवरून नोटीस पाठविण्यात आली आहे. संबंधित पथक या अधिश बंगल्याची मोजमाप आणि तपासणी करण्यासाठी शुक्रवारी म्हणजे आज जाणार असल्याचे नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे. त्या वेळेत सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. या पूर्वी देखील बंगल्याच्या बांधकामाबाबतची सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती.