पालघर जिल्ह्यात एका औषधाच्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून लाखोंची औषधे जप्त केली आहे. या कारवाईमुळे कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये खळबळ उडाली आहे. एफडीए कंपनी कडून औषधांचे अनेक नमुने घेतले असून या नमुन्यांची अधिक तपासणी केली जाईल. या तपासणीत अनियमितता आढळल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पालघर औषध निरीक्षकांनी उत्पादन आणि सुरक्षा मानकांचे पालन केले जात आहे की नाही हे तपासण्यासाठी पुढील चाचणीसाठी कंपनीकडून नमुने घेतले, असे निवेदनात म्हटले आहे. या नमुन्यांची कसून चौकशी केली जाईल आणि निकालाच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत एफडीएने दिले.