मिळालेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, हा पूल पूर्व आणि पश्चिम दक्षिण मुंबईला जोडेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी प्रमुख उपस्थित राहतील. अशी माहिती समोर आली आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर आणि पी. डी'मेलो रोडला जोडणारा सिंदूर (पूर्वी कार्नॅक) रेल्वे उड्डाणपुल दक्षिण मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो, ज्यामुळे दुतर्फा वाहतूक होते आणि प्रवाशांना सोयीस्कर मार्ग मिळतो. या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह-पालक मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे आणि राजहंस सिंह, महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.