महाराष्ट्रातील नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या, मुसळधार पावसाच्या अंदाजा लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
जून महिन्यात तुलनेने कमी पावसामुळे जिल्ह्याचा अनुशेष ४४ टक्क्यांपर्यंत वाढला होता, परंतु जुलै महिन्यात तो अनुशेष पूर्णपणे भरून निघाला आहे. गेल्या ३ दिवसांच्या पावसाने नुकसान भरून काढले आहे. तसेच अमरावती आणि वर्धा जिल्हे वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता पावसाचे प्रमाण वाढले आहे.