अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सिद्धीविनायकाचे दर्शन बंद

गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (22:20 IST)
राज्यातली कोरोनाची वाढती आकडेवारी  पाहता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने अंगारकी चतुर्थीच्या  दिवशी ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अशा भाविकांनाच प्रवेश असणार आहे, ज्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे शिवाय ज्यांच्याकडे या रजिस्ट्रेशनचा  क्यूआर कोड (QR Code) आहे.
 
2 मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. यादिवशी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता भाविकांच्या दर्शनावर निर्बंध आणले आहेत. ज्यांना दर्शनाची परवानगी आहे, त्यांना देखील सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यानच दर्शन घेता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती