रुग्ण वाढले तर लॉकडाउन होऊ शकतो: पालकमंत्री अस्लम शेख

बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (09:53 IST)
महाराष्ट्रात कोरोनाची पुन्हा एकदा लाट आली असून फेब्रुवारीपासून मुंबईत करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे आणि याच पार्श्वभूमी रुग्ण वाढले तर लॉकडाउन होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
 
अस्लम शेख यांना सूचक वक्तव्य करत म्हटले की लोकल बंद होऊ नयेत, तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले आणि म्हटले की तरी लोक ऐकत नसतील तर कारवाई होईल. त्यांनी म्हटले रुग्णसंख्या वाढत आहेत, आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. सरकारनं नियमावली ठरवून दिली आहे, तरीही जेथे याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे त्या हॉटेल, नाइट क्लबवर कारवाई सुरू आहे. रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देण्यास मनाई आहे. तसेच लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असली तरी तेथे शेकडो लोक पोहचत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउन नको असेल तर मुंबईकरांनी जबाबदारीने वागले पाहिजे. लॉकडाउन लावण्याची वेळ येऊ नये यासाठीच हा प्रयत्न आहे, असे अस्लम शेख यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती