ही घटना गुरुवारी सकाळी 8 ते 11 च्या दरम्यान घडली. जेव्हा अकरावीचे वाणिज्य विद्यार्थी इंग्रजी विषयाची परीक्षा देत होते. यादरम्यान, आरोपी सुपरवायझर 16 वर्षीय पीडितेच्या शेजारी बसला आणि तिला जाणूनबुजून अयोग्यरित्या स्पर्श केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने पीडितेच्या छातीला अनेक वेळा स्पर्श केला. यानंतर त्याने अश्लील हावभावही केले. एवढेच नाही तर उत्तर प्रत गोळा करताना, पर्यवेक्षकाने पीडितेच्या हाताला अयोग्यरित्या स्पर्शही केला.
परीक्षेनंतर जेव्हा विद्यार्थिनी घरी पोहोचली तेव्हा तिने तिच्या आईला ही गोष्ट सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार केली. आरोपी पर्यवेक्षकाविरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात बीएनएस आणि पोक्सो कायद्याच्या कलम 75 अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आम्ही या प्रकरणात अधिक तपास करत आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले. तक्रारीच्या आधारे, आरोपी पर्यवेक्षकाला नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.