महाराष्ट्रात महायुती सरकार 2.0 ची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. आता राज्याचे 100 दिवस पूर्ण होणार आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह 15 अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सातारा पोलिस अधीक्षक समीर असलम शेख, संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्रा, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांचा समावेश आहे.
याशिवाय ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, चंद्रपूर जेपीचे सीईओ विवेक जॉन्सन, नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार, आदिवासी आयुक्त लीना बनसोडे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, मृद आणि जलसंधारण सचिव गणेश पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.