मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ २०२५ चा आज शेवटचा दिवस आहे. यानंतर, कुंभमेळ्यासाठी सर्वांच्या नजरा नाशिकवर असतील. कारण पुढचा कुंभमेळा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात होणार आहे. महाराष्ट्र सरकारने या भव्य कार्यक्रमाची तयारी आधीच सुरू केली आहे. नाशिक कुंभ २०२७ निमित्त मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “आम्ही काही गोष्टींचे नियोजन केले आहे पण आमच्याकडे जागा आणि पाण्याची कमतरता आहे. सर्वात मोठे आव्हान म्हणजे आपला कुंभ पावसाळ्यात होतो. आम्ही बैठकीत यावर चर्चा केली आहे.”
तसेच नाशिक कुंभमेळा २०२७ बद्दल महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "आम्हाला उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे कुंभमेळ्यावर कायदा आणायचा आहे, जेणेकरून कुंभमेळ्याचे काम सहज आणि जलद गतीने करता येईल." महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक कुंभमेळ्यासंदर्भात बैठक घेतली. गिरीश महाजन म्हणाले, “हा कायदा येत्या विधानसभा अधिवेशनात आणला जाईल. कुंभमेळ्याच्या संदर्भात वाहतूक, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यासाठी पैशाची कमतरता भासणार नाही असे आश्वासन दिले आहे.