सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यावर न्यायालयाने पोलिसांना आणि अबू आझमींना सूचना दिल्या आहे.
सपा आमदार अबू आझमी यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले होते की, अबू आझमी यांना12, 13 आणि 15 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल. 20,000 रुपयांच्या सॉल्व्हेंट सिक्युरिटी बॉन्डवर अबू आझमी यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.