चिराग पासवान मुंबईत म्हणाले- जातीची जनगणना झाली पाहिजे;

गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (10:18 IST)
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बुधवारी देशभरात जात-आधारित जनगणनेची बाजू मांडली. तसेच ते म्हणाले की, या प्रक्रियेतून मिळणारा डेटा समाजातील ज्या घटकांना पुढील उन्नतीची गरज आहे, त्यांची खरी लोकसंख्या जाणून घेण्यास मदत होईल.   
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री पासवान म्हणाले की, 'आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. तसेच जातीवर आधारित जनगणना झाली पाहिजे, कारण  समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक धोरणे जातीच्या आधारावर बनवली जातात. . तसेच त्या समाजाच्या लोकसंख्येची आकडेवारी तरी सरकारकडे असली पाहिजे, जेणेकरून त्यानुसार निधीचे वाटप करता येईल.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती