घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारने केंद्राकडे केली मागणी

मंगळवार, 30 मार्च 2021 (16:16 IST)
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोरोनाची लस घेतली. वांद्रे कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रात भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस चहल यांनी टोचून घेतला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारने केंद्राकडे मागणी करण्याची विनंती केली.
 
कोरोना लस घेतल्यानंतर इक्बाल चहल म्हणाले की, ‘परवा तामिळनाडूमध्ये एकत्रिपणे १० ते १२ रुग्णवाहिका घेऊन एका विभागात गेले आणि २ तासांत त्यांनी ४०० लसीकरण केले. तसेच राजस्थानमध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सिंग स्टाफ घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण करत आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला देखील घरोघरी लस देण्यासाठी परवानगी घ्यावी, अशी राज्य सरकारने केंद्राला विनंती करावी. जर उद्या किंवा परवा केंद्राची परवानगी मिळाली, तर दिवसाला १ लाख लसीकरण केले जाईल, अशी माझी खात्री आहे.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती