म्हणून पार्थ पवार यांनी घेतली भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट

मंगळवार, 30 मार्च 2021 (16:05 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली. 
 
हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात. हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा (माई) अरुणराव पाटील यांचे निधन झाले. 18 मार्च 2021 रोजी अल्पशा आजाराने अनुराधा पाटील यांची प्राणज्योत मालवली. या पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती