कोरोनामुळे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन

बुधवार, 17 मार्च 2021 (08:18 IST)
कोरोनामुळे माजी केंद्रीय मंत्री आणि अहमदनगरचे माजी खासदार भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. आज (१७ मार्च) पहाटे दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी चाचणी केली असता त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर ते उपचारासाठी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात भरती झाले होते.
 
दिलीप गांधी यांनी ३ वेळा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ मध्ये भाजपने या मतदार संघातून सुजय विखे यांना तिकीट दिल्याने दिलीप गांधी पक्षावर नाराज होते. भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा दिलीप गांधी यांचा प्रवास कौतुकास्पद होता. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. तर २९ जानेवारी २००३ ला त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपत घेतली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती