बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपींला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (15:33 IST)
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीची पोलीस कोठडी बुधवारी स्थानिक न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत वाढवली. बुधवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपीला कल्याण जिल्ह्यातील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, तक्रारीनुसार, आरोपीने शाळेच्या शौचालयात दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले.
 
या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. रेल्वे रोको केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या 300 आंदोलकांवर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, दगडफेक करणे, दंगल पसरवण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर आरोपांखाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
 या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी २२ आंदोलकांना अटक केली आहे. अटक केलेल्या आंदोलकांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लवकरच जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे आंदोलकांच्या वकिलाने सांगितले आहे.  पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून आंदोलनात सहभागी असलेल्या इतरांचा शोध सुरू आहे.
Edited by - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती