ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे मुलींच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात मंगळवारी संतप्त नागरिकांनी गदारोळ केला. रेल्वे रोखण्यात आली. रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला. अफवांवर आळा घालण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून आंदोलन करणाऱ्या प्रकरणात पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या 300 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 40 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दोन चिमुकलींच्या लैंगिक शोषण निषेधार्थ बदलापूरात रेलरोको निर्दशने करण्यात आली. या काळात मध्य रेल्वेच्या काही रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या. आंदोलकांनी शाळेत तोडफोड केली आणि रेल्वे रुळावर दगडफेक केली. पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांवर देखील लोकांनी दगडफेक केली. 10 तासांनंतर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणि रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात आली.