ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ झाल्याच्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी बदलापूरमध्ये लोकांनी जोरदार निदर्शने करत रेल्वे स्टेशन आणि शाळेला घेराव घातला. शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत मुलीचे काय झाले याचा तपशील एफआयआर मध्ये दिला आहे.
एफआयआर मध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ही घटना 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली आहे. एका मुलीच्या पालकांना आहि अघटित होण्याचा संशय आला त्यांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांशी बोलल्यावर त्यांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करत असल्याचे सांगितले.
सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी या घटनेची माहिती 16 ऑगस्ट रोजी पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांनी 12 तासा नंतर 16 ऑगस्टच्या रात्री 9 वाजता एफआयआर नोंदवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळा परिसरात मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख एफआयआर मध्ये केला आहे.
या प्रकरणात आरोपीवर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि कलम 65 (2) (बारा वर्षांखालील मुलीवर बलात्कार), 74 (विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला करणे ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आणि कलम 75 आणि 76 कायद्याच्या अंतर्गत आरोपीला अटक केली आहे.