मुंबईतील मनीषा नगर येथील नागरिकांसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन केल्यानंतर आव्हाड यांनी शिवथाळीचा आस्वाद घेतला. मात्र शिवथाळीचा आस्वाद घेताना आव्हाड यांनी पाणी पिण्यासाठी बिस्लेरी बाटली सोबत घेतली होती. त्यांचा हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.