मुंबई महापालिकेकडून नाईट लाइफसाठी विस्तृत नियमावली

मुंबईच्या अनिवासी भागात 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 'नाईट लाइफ' सुरू होणार आहे. त्यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.  
 
पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांची काय काय जबाबदारी असणार आहे, हे या नियमावलीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे 24 तास सुरू राहणाऱ्या मॉल, रेस्टॉरंटने कुठले नियम पाळणे गरजेचं आहे, याचेही नियम सांगण्यात आले आहेत.
 
नाईट लाइफसंदर्भातील नवीन नियमांनुसार रात्री दीड वाजेपर्यंतच मद्यविक्रीस परवानगी असणार आहे. रात्री दीड वाजल्यानंतर दारु विकल्यास संबंधितांचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल. तसेच तेथील मॉल किंवा मिलला नाईट लाईफ सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली जाईल.
 
नाईट लाइफ दरम्यान कामगार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती