कोरोनापासून खबरदारीचे उपाय म्हणून नागरिक सॅनिटायझर, मास्कची खरेदी करतात. पण या संकटातही सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. क्राइम ब्रँचच्या युनिट ३ च्या पथकानं बनावट एन ९५ मास्क (N 95 Mask) विकणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपये किंमतीचे मास्क जप्त करण्यात आले आहेत.
व्हिनस कंपनीच्या नावाखाली हे मास्क तयार करून विकले जात होते. याबाबत कंपनीला माहिती मिळाली असता, त्यांनी पोलिसांत कळवले. त्यानंतर पोलिसांनी गोदामावर छापेमारी केली. या कंपनीचे एन ९५ मास्क हे देशभरातील अनेक रुग्णालये आणि अन्य ठिकाणी डॉक्टरांकडून वापरले जात आहेत.