एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात प्रार्थना करून हे वृद्ध जोडपे घरी परतत असताना अंधेरीतील विजय नगर सर्व्हिस रोडवर एका भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने अॅक्टिव्हाला धडक दिली. त्यामुळे अॅक्टिव्हा चालवणारे जोडपे खाली पडले.
मागून येणाऱ्या टँकरने स्कूटर वर बसलेल्या पत्नी मागीबेन पटेल (63) यांना चिरडले, तर पती रामजी पटेल (62) काही अंतरावर पडले. अपघातानंतर आरोपी चालक टँकर घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने वृद्ध जोडप्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.