मुंबईतील घाटकोपर येथील एका गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या

Webdunia
सोमवार, 3 जानेवारी 2022 (14:26 IST)
मुंबईतील घाटकोपर भागात एका गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग सोमवारी सकाळी लागली असून माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख