मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारी येथे 6347 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दरम्यान 451 लोक बरे झाले आणि एका कोरोनाबाधिताचाही मृत्यू झाला. आदल्या दिवशी नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये 5712 बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. यापूर्वी शुक्रवारी मुंबईत 5631 रुग्ण आढळले होते. सध्या येथे 22,334 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 7,50,158 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण असू शकतात. या दरम्यान सुमारे 80 हजारो लोकांचा मृत्यूही होऊ शकतो. अशी भीती महाराष्ट्राचे आरोग्य सचिव यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, राज्यात एक टक्काही मृत्यू झाला तर हा आकडा 80 हजारांवर जाऊ शकतो. व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कोरोनाची तिसरी लाट हलकी होईल, अशा भ्रमात राहू नका, असा इशारा दिला आहे. म्हणून, लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करणे सर्वात महत्वाचे आहे.