मुंबई महानगरात महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीला फसवून तिचा विनयभंग केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल खान वय 21 असे आरोपी तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेलविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि आयटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नागपाडा येथे राहणारा 21 वर्षीय सोहेल खान आपल्या मैत्रिणीला कॉलेजमधून घरी सोडण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. खान त्याच्या मैत्रिणीला तिच्या घराऐवजी भायखळा येथील हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले.
तसेच दोघेही रिलेशनशिपमध्ये असून त्यांच्या पालकांनी त्यांच्या लग्नाला होकार दिल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. पण वडिलांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळेच वडील बरे झाल्यानंतर दोघांचे लग्न लावून देणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र सोहेलने तिला हॉटेलमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी पीडितेच्या मैत्रिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने दावा केला की तिने नकार देऊनही आरोपी सोहेल तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोहेलला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.