मुंबईत २४ तासात ११४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पालिकेने तयार केलेल्या हेल्पलाईनवर गेल्या १५ दिवसांपासून कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याबाबत तब्बल २ हजार ४०४ तक्रारीची नोंदी झाल्या आहेत. ५ जानेवारीपासून मुंबईत कावळे, कबुतरे, चिमण्यांनाच्या मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत बर्ड फ्ल्यूच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पालिकेने अंडी, मांस, चिकन चांगले शिजवून खाण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे अनेक मुंबईकरांनी बर्ड फ्ल्यूच्या भीतीने चिकन, अंडी खाणे बंद केले आहे. मुंबईत गेल्या ५ जानेवारीपासून कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या घटनासत्राला सुरुवात झाली. त्यानंत गिरगाव, चेंबूरसारख्या मुंबईच्या अनके ठिकाणाहून कावळे, कबुतरे, मृत पावल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मुंबईतील मालाड, दादर, सायन, माटुंगा, बोरिवली, कांदिवली, अंधेरी, प्रभादेवी, वडाळा,माटुंगा, सायन, मानखुर्द, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरातही कावळे कबुतरे मृत पावल्याच्या तक्रारी पालिकेच्या हेल्पलाईनवर येत आहेत.