मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आता एसी लोकलच्या १० फेऱ्या वाढणार : एसी लोकल फेऱ्यांचं वेळापत्रक

गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (23:05 IST)
मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आता एसी लोकलच्या १० फेऱ्या वाढणार आहेत. सध्या सुरू असलेल्या सामान्य लोकलच्या जागी १० एसी लोकल चालवण्यात जाणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आता आणखी १० एसी लोकल फेऱ्या मिळाल्या आहेत.
 
मध्य रेल्वे मार्गावर सध्या दररोज सुरू असलेल्या एसी लोकल फेऱ्यांमध्ये या नव्या १० फेऱ्या वाढल्यानंतर एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या ६६ इतकी होणार आहे. तर एकूण सर्व लोकल फेऱ्यांची संख्या १८१० इतकी राहणार आहे. मध्य रेल्वेवर प्रवाशांची सर्वाधिक संख्या असलेल्या पिक अवर्समध्ये सकाळी आणि संध्याकाळी १० एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढणार आहे.
 
वाढवण्यात आलेल्या एसी लोकलच्या फेऱ्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळात चालवल्या जाणार नाहीत. म्हणजेच सु्ट्टीच्या दिवशी एसीऐवजी सामान्य लोकल चालवल्या जातील.
 
मध्य रेल्वेवर वाढवण्यात आलेल्या एसी लोकल फेऱ्यांचं वेळापत्रक-
 
T36*ठाणे- सीएसएमटी फास्ट लोकल- सकाळी ८.२० वाजता
BL-9* सीएसएमटी-बदलापूर फास्ट लोकल- सकाळी ०९.०९ वाजता.
BL-20* बदलापूर-सीएसएमटी फास्ट लोकल- सकाळी १०.४२ वाजता.
K-51 सीएसएमटी-कल्याण फास्ट लोकल- दुपारी १२.२५ वाजता
K-62 कल्याण-सीएसएमटी फास्ट लोकल- दुपारी १.३६ वाजता.
T-83 सीएसएमटी-ठाणे स्लो लोकल- दुपारी ३.०२ वाजता.
T-96 ठाणे-सीएसएमटी स्लो लोकल- दुपारी ४.१२ वाजता.
BL-35*सीएसएमटी-बदलापूर फास्ट लोकल- संध्याकाळी ५.२२ वाजता.
BL-54*बदलापूर-सीएसएमटी फास्ट लोकल- संध्याकाळी ६.५५ वाजता.
T-129 सीएसएमटी-ठाणे फास्ट लोकल- रात्री ८.३० वाजता.
 
याआधी महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम रेल्वे झोननंही प्रवाशांनी दिलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन मुंबई उपनगरातील एसी लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यात 8 नवीन एसी सेवा सुरू केल्यामुळे पश्चिम रेल्वेवर एसी फेऱ्यांची एकूण संख्या आता ४० वरून ४८ पर्यंत वाढणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती