बाईच बाईला फसवू पाहते

सोमवार, 8 मार्च 2021 (11:02 IST)
बाईच बाईला फसवू पाहते,
तिचं दुसरीचा विश्वासघात करते,
विवाहबाह्य सम्बन्ध, फॅशनच आहे,
हेंच चित्र सर्वत्र खुशाल दिसत आहे,
एक स्त्रीचं दुसरीला मात्र फसवतेय,
स्त्री जातीला कलंक ठरू पाहतेय,
अश्या स्त्री ला स्त्री मन कसें बरे असेल,
खरी स्त्री दुसरीला कशी बरें फसवेल?
लाज वाटायला हवी,अश्या बायकांना,
खुशाल उजळ माथ्याने समाजात वावरताना,
करा विचार थोडा तरी इतरांच्या भावनांचा,
असें संबंध ठेवून,निर्लज्जपणे वावरण्याचा,
द्या वचन येणाऱ्या महिला दिनाच,
वाकडं पाऊल पुनः न उचलण्याच!!
 
अश्विनी थत्ते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती