लागणारे जिन्नस: एक किलो कैरी, दोन मोठे चमचे साखर, भाजलेल्या जीर्याची पूड, तीन छोटे चमचे मीठ, काळे मीठ एक छोटा चमचा, आवश्यकतेनुसार पुदिन्याची पाने.
करावयाची कृती: कैरीचे सालं काढून घ्या. कुकरमध्ये कैरी आणि पाणी टाकून तीन शिट्या होऊ द्या. थंड झाल्यावर उकळलेली कैरीचा आतील बलक व्यवस्थित मैश करून घ्या. त्यात दहा कप थंड पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या आणि गाळून घ्या. त्यात साखर, मीठ, काळे मीठ, जिरेपूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. पुदिन्याची पाने चिरून टाका. थंड-थंड पन्हं सर्व्ह करा.