चविष्ट सोयाबीन उपमा

बुधवार, 24 एप्रिल 2024 (06:54 IST)
न्याहारीसाठी दररोज काय करावे हा एक मोठा प्रश्न सर्व स्त्रियांसाठी असतो, आज आम्ही आपल्याला सोयाबीन चा उपमा करण्याची रेसिपी सांगत आहोत. हे पौष्टीक आहेत ,या शिवाय या मुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळेल.चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 
1 चमचा शेंगदाणे भाजलेले,1 कप भिजत घातलेले सोयाबीनचंक्स ,1/2 कप दूध,1/2 चमचा मोहरी,कडीपत्ता,1 अक्खी लालमिर्ची,मीठ आणि तेल चवीप्रमाणे, बारीक चिरलेले टोमॅटो ,कांदा,हिरव्यामिरच्या,ढोबळी मिरची, गाजर,आमसूल पूड,तिखट,धणेपूड,हळद,गरम मसाला गरजेप्रमाणे.    
 
कृती- 
एका पॅन मध्ये मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. या मध्ये मोहरी,कडी पत्ता आणि अख्खी लाल मिरची घाला. फोडणी झाल्यावर चिरलेल्या भाज्या, मीठ,भिजत घातलेलं सोयाबीनचंक्स आणि शेंगदाणे, हळद, तिखट, आमसूलपूड,धणेपूड,गरम मसाला,घाला आणि  परतून घ्या.या मध्ये अर्धा कप दूध  घालून चांगले परतून घ्या आणि झाकण लावून  झाकून ठेवा.5 मिनिटाने गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती