चहासह खास स्नॅक बटाटा-रव्याची भजी

Webdunia
शुक्रवार, 21 मे 2021 (17:26 IST)
संध्याकाळच्या चहासह काही खावे से वाटले तर आपण बटाटा-रवा भजी बनवू शकता. हे आपल्या घरातील सर्व सदस्य आवडून खातील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य- 
3 बटाटे, 1 कांदा, 1 चमचा जिरेपूड,2 हिरव्या मिरच्या,चवीप्रमाणे मीठ,1 लहान चमचा हळद ,1 चमचा तिखट,1 चमचा आलं लसूण पेस्ट,3 मोठे चमचे रवा, 1 मोठा चमचा तांदुळाचं पीठ,लिंबाचा रस,तेल तळण्यासाठी.
   
कृती- 
बटाटे किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि इतर साहित्य तिखट,जिरेपूड,हिरव्या मिरच्या,आलं लसूण पेस्ट,तांदुळाचं पीठ, रवा, मीठ,हळद,लिंबाचा रस मिसळा.आणि लागत लागत पाणी घालत त्याचे  मिश्रण तयार करा. 
एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्या तेलात चमच्याने किंवा हाताने मिश्रण टाका. भजी तांबूस सोनारे रंग येई पर्यंत तळून घ्या.गरम बटाटा आणि रव्याची भजी सॉस किंवा चटणीसह सर्व्ह करा.    
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख