यीस्ट पावडर मध्ये साखर आणि 5 चमचे कोमट पाणी मिसळून मिक्स करा. नंतर हे मिश्रण झाकून 5 ते 7 मिनिटे ठेवा. मैद्यात यीस्ट -साखरेचे मिश्रण आणि उर्वरित जिन्नस घालून आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून मऊसर मळून घ्या. ओल्या कपड्याने झाकून अर्धा तास तसेच ठेवा. पुन्हा मळून घ्या. गोळी घेऊन लाटून घ्या.
एका नॉनस्टिक तव्यावर तेल लावून नान दोन्ही बाजूने सोनेरी होई पर्यंत शेकून घ्या. लोणी लावून पनीरच्या भाजीसह सर्व्ह करा.