साहित्य -
100 ग्रॅम हरभरा डाळीचे पीठ, 1 मोठा चमचा ब्रेड क्रम्स, 1/2 चमचा तिखट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लसणाची पेस्ट, 50 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, 20 ग्रॅम चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, मीठ चवीपुरती, पाणी.
कृती -
व्हेज ऑमलेट बनविण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात हरभरा डाळीचे पीठ, ब्रेडक्रम्स आणि मीठ मिसळा या मिश्रणात लागत लागत पाणी घालून घोळ तयार करा. या घोळाला 30 मिनिटे तसेच राहू द्या. या मध्ये लसूण पेस्ट, तिखट, हिरव्या मिरच्या, हळद घालून फेणून घ्या. आता एका पॅनला गरम करून त्या मध्ये हा घोळ घाला. या मध्ये वरून कांदा, ढोबळी मिरची, कोथिंबीर घाला, कडेने तेल सोडा. आता ह्याच्या वर झाकणी ठेऊन मंद आचेवर शिजवून घ्या नंतर पालटून द्या. व्हेज ऑमलेट खाण्यासाठी तयार आहे. टोमॅटो सॉस सह सर्व्ह करा.