साहित्य-
1 कप मसूर डाळ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 मधून चिरलेल्या मिरच्या, 1/2 चमचा आलं-लसूण पेस्ट,1/4 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, गरजेप्रमाणे तेल, कोथिंबीर बारीक चिरलेली.
कृती -
एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये कांदा घालून परतून घ्या. या मध्ये टोमॅटो आणि मिरच्या घाला आणि शिजवून घ्या. टोमॅटो शिजल्यावर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून 1 मिनिटे शिजवून घ्या. नंतर या मध्ये मसूर डाळ, तिखट, हळद, घालून 2 मिनिटे शिजवून घ्या. यामध्ये अडीच कप पाणी घाला आणि डाळ शिजे पर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या. वरून मीठ घाला. 15 मिनिटे शिजवून घ्या. उकळी आल्यावर गॅस बंद करा कोथिंबीर वरून भुरभुरून द्या आणि नान किंवा पोळी किंवा राईस सह सर्व्ह करा.