ब्रेड दही वडा चटकन बनवा पटकन खा

सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (11:27 IST)
दही वडा अशी डिश आहे जी कोणत्याही सामान्य दिवसाला खास बनवू शकते. आपण ब्रेड पासून बनलेल्या बऱ्याच खाद्य पदार्थांचा आस्वाद तर घेतलाच असेल. आज आम्ही आपल्याला ब्रेड पासून दही वडे करण्याची रेसिपी सांगत आहोत हे फार कमी वेळात बनतात आणि चवीला देखील चांगली लागते. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी.
 
साहित्य-
ब्रेड स्लाइस, 3/4 कप दही, चवी प्रमाणे हिरवी चटणी, गरजे प्रमाणे चिंचेची गोड चटणी, हिरव्या मिरच्या, 1 लहान चमचा साखर, जिरेपूड, तिखट, मीठ, आमसूल पूड (सर्व 1 लहान चमचा) बेदाणे, कोथिंबीर, उकडलेले बटाटे, चवी प्रमाणे पादेलोण किंवा काळं मीठ.
 
कृती - 
ब्रेडचे चारी बाजू कापून घ्या. एका भांड्यात उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. या मध्ये हिरव्या मिरच्या, आमसूल पूड, बेदाणे, जिरे पूड आणि मीठ घाला. सर्व जिन्नस मिसळा आणि बाजूला ठेवा. एका भांड्यात दही घेऊन त्यामध्ये साखर घालून चांगल्या प्रकारे मिसळा. बटाट्याच्या सारणाचे गोळे करा आणि ब्रेडच्या स्लाइसने त्याला कव्हर करा. एका कढईत तूप किंवा तेल घाला. त्यात ब्रेड वडा तळण्यासाठी टाका, सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. ब्रेड वडे एका प्लेट मध्ये घालून त्यावर गोड दही, चिंचेची चटणी, कोथिंबीर चटणी, जिरेपूड, तिखट घाला. सर्व्ह करण्याच्या पूर्वी थोडंसं दही, काळे मीठ, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती