साहित्य -
लादी पाव, पुदिन्याची चटणी, लसणाची कोरडी चटणी, गोड चटणी, वडा, लोणी लसणाचा सॉस, 3 बटाटे, कोथिंबीर, मोहऱ्या, हिंग, आमसूल पूड, लिंबाचा रस, तेल, हिरव्या मिरच्या आलं लसूण पेस्ट, 1 कप हरभराच्या डाळीचे पीठ, तिखट, बेकिंग सोडा, मीठ, तेल तळण्यासाठी.
कृती -
सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये मोहऱ्या आणि हिंग घाला. नंतर हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. या मध्ये उकडलेले मॅश केलेले बटाटे घाला. वरून लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, आमसूल पूड आणि कोथिंबीर घाला. मिश्रण थंड होऊ द्या. आता या मिश्रणाचे लहान गोळे करा.
घोळ बनविण्यासाठी हरभराडाळीचे पीठ आणि बेकिंग सोडा घालून चाळणीने चाळून एका भांड्यात काढून घ्या. या मध्ये मीठ, हळद, तिखट, हिंग घालून पाण्यात घोळून घ्या. घोळ घट्टसर ठेवावा.