फक्त १५ मिनिटात बनवा चमचमीत बेसन गट्ट्याची भाजी

शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (12:46 IST)
साहित्य -
1 कप हरभराडाळीचे पीठ, 2  टोमॅटोची पेस्ट, 2 चमचे दही, 1 चमचा तिखट, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणेपूड, 1/2 चमचा काश्मिरी लाल तिखट, 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 चमचा कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 कांदा, चवी पुरते मीठ, तेल.
 
कृती -
हरभराच्या डाळीच्या पिठात मीठ, कोथिंबीर, धणेपूड, तिखट, हळद, 2 चमचे तेल, हिंग, जिरे आणि पाणी घालून घट्ट गोळा तयार करा. त्याला रोलचा आकार देऊन गरम पाण्यात एक उकळी घेऊन घ्या. नंतर गार झाल्यावर सुरीने चौरस काप करुन करा. 
 
आता कढईत तेल घालून त्यात जिरे टाका. या मध्ये कांदा आणि आलं लसूण पेस्ट घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. उरलेले सर्व मसाले आणि दही घाला मंद आचेवर शिजवून घ्या. आता या मध्ये टोमॅटोची पेस्ट घाला. चवीपुरती मीठ घाला. चांगल्या प्रकारे मिसळून मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. लागतं-लागतं पाणी घाला. चांगली उकळी आल्यावर हरभरा डाळीच्या पिठाचेचे कापलेले तुकडे घाला वरून कसुरी मेथी भुरभुरून द्या आणि मंद आचेवर चांगले शिजवून घ्या. गरम हरभऱ्याच्या गट्ट्याची भाजी गरम पोळी किंवा पराठ्यासह सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती