मटारचे चविष्ट पराठे

गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (16:56 IST)
साहित्य - 
1 कप उकडलेले ताजे वाटाणे किंवा मटार, 1 कप गव्हाचं पीठ, 1 उकडलेला बटाटा, 1/2 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, शोप, तिखट, चिमूटभर हिंग, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली, चवी प्रमाणे मीठ, तेल.
 
कृती -
सर्वप्रथम उकडलेले वाटाणे मिक्सर मध्ये वाटून घ्या. बटाटे मॅश करा. या वाटलेल्या वाटणं मध्ये बटाटे, मीठ, कोथिंबीर, शोप, हिंग, हिरव्या मिरचीची पेस्ट, तिखट मिसळून गव्हाच्या पिठात घालून मळून घ्या. आता मळलेल्या कणकेचे पराठे लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूने तेल लावून सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. गरम गरम चविष्ट मटार पराठे कढी, दही किंवा लोणच्यांसह सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती