साहित्य- पाव किलो मोड आणून शिजवलेली मटकी, दोन उकळलेले बटाटे, तीन कांदे, दोन टोमॅटो, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, एक वाटी खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, हिंग, लिंबू, मोहरी, हळद, कढीपत्ता, मीठ, तेल, फरसाण.
कृती- मोड आलेली मटकी भाजून घ्या. कढईत तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट टाका. अता चिरलेले बटाटे, टोमॅटो टाका. खवलेले नारळ घालून परता. त्यानंतर धान्य टाका.